Call us: 9823170310 | E-mail: sandeepinchanalkar@gmail.com

Dr. Sandeep Inchanalkar

CALL US - 9921341134
लाईफ लाईन हॉस्पिटल

लाईफ लाईन हॉस्पिटल

सध्या जगभरामध्ये COVID-19 या कोरोना विषाणूचा संसर्ग वाढला आहे आणि हा थांबविण्यासाठी जमावबंदी (lockdown) हाच एक उपाय आहे. पण हॉस्पिटल ही एक अत्यावश्यक सेवा आहे तसेच मेंदू आणि मणक्याच्या आजारामध्ये वेळेला फार महत्व आहे म्हणून आशा रुग्णांवर ताबडतोब उपचार करणं गरजेचं असतं या दरम्यान आपल्या हॉस्पिटलमध्ये बऱ्याच शस्त्रक्रिया झाल्या यामध्ये ब्रेन ट्युमर , पॅरॅलीसिस, अपघाती शस्त्रक्रिया यांचा समावेश आहे म्हणूनच पेशंटची गैरसोय होऊ नये म्हणून आपल्या हॉस्पिटलची सेवा सुरू ठेवण गरजेचं आहे म्हणून लाईफ लाईन हॉस्पिटल 24 तास सेवा पुरवत आहे.

Read more

लाईफ लाईन हॉस्पिटल

लाईफ लाईन हॉस्पिटल

सर्व स्टाफ आपले कर्तव्य आणि जबाबदारी ओळखून दिवस रात्र काम करत आहेत पण काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आणि पेशंट चे आरोग्यही तितकच महत्वाचं आहे याची जाणीव ठेवून आम्ही लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये स्टाफ आणि पेशंटची काळजी म्हणून सुरक्षिततेसाठी लागणाऱ्या सर्व उपकरणांचा वापर करून काम करत आहोत यामध्ये डिसइन्फेक्टन्ट टनल, पी पी ई किट, फेस शिल्ड, कॅप, मास्क, ग्लोव्हज, सॅनिटायजर, हँडवॉश यांचा समावेश आहे.

Read more


मानदुखी

मानदुखी, ज्याला गर्भाशय ग्रीवा देखील म्हणतात, ही एक सामान्य समस्या आहे, कारण लोकसंख्येच्या दोन तृतीयांश लोकांच्या आयुष्यात मानदुखी असते आणि ती नेहमी मानेच्या मध्यभागी नसते. ते तुमच्या वरच्या शरीरात पसरू शकते, तुमचे खांदे, हात आणि छातीवर परिणाम करू शकते आणि त्यामुळे डोकेदुखी.

मान दुखणे म्हणजे काय?

मान आणि पाठीच्या वरच्या दोन्ही भागांतील स्नायूंच्या ताणामुळे किंवा मानेच्या मणक्यांमधून बाहेर पडणाऱ्या नसा चिमटीत झाल्यामुळे मानदुखी उद्भवू शकते. मानेतील सांधे फाटल्याने वेदना होतात, तसेच पाठीच्या वरच्या भागात सांधे फाटल्याने वेदना होतात. हे इतके सामान्य आहे की इस्केमिक हृदयरोग, सेरेब्रोव्हस्कुलर रोग आणि खालच्या श्वसनमार्गाच्या संसर्गानंतर जगभरातील अपंगत्वाचे ते चौथे प्रमुख कारण आहे. जवळजवळ 30 टक्के दरवर्षी याचा अनुभव घेतात.

कारणे

जास्त वेळ चुकीच्या आसनात बसणे आणि संगणकाच्या स्क्रीनवर झुकणे किंवा कुबडणे यामुळे डोके पुढे जाऊ शकते, ज्यामुळे मानेवर अतिरिक्त ताण येतो.रात्री चुकीच्या कोनात किंवा चुकीच्या वळणावर डोके धरून चुकीच्या स्थितीत झोपणे, सकाळी मान ताठ होऊ शकते.आपले डोके वारंवार वळवण्याच्या वारंवार हालचाली, जसे की नृत्य किंवा पोहताना बाजूने बाजूला करणे, यामुळे मानेच्या स्नायू, कंडरा आणि अस्थिबंधनांचा अतिवापर होऊ शकतो.मानेची हाडे (सर्विकल मणक्यांची) फ्रॅक्चर झाल्यास, पाठीच्या कण्यालाही इजा होऊ शकते. अचानक डोके हलल्यामुळे मानेच्या दुखापतीला सामान्यतः व्हिप्लॅश म्हणतात.संधी वांत वेदना, सांधे सुजणे, आणि हाडांचे स्फुर्स कारणे. जेव्हा हे मानेच्या भागात आढळतात तेव्हा मान दुखू शकते.

उपचार

मध्यम ते सौम्य मानदुखीचे सर्वात सामान्य प्रकार काही आठवड्यांमध्ये स्वत: ची काळजी घेण्यास सकारात्मक प्रतिसाद देतात. मानदुखी कायम राहिल्यास, परिणामांवर आधारित, तुमचे डॉक्टर इतर उपचारांची शिफारस करू शकतात, ज्यात हे समाविष्ट असू शकते:तुमचे डॉक्टर प्रिस्क्रिप्शनशिवाय तुम्हाला मिळू शकतील त्यापेक्षा अधिक मजबूत वेदनाशामक औषधे लिहून देऊ शकतात आणि वेदना कमी करण्यासाठी स्नायू शिथिल करणारे आणि ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसेंट्स लिहून देऊ शकतात.अॅक्युपंक्चरमध्ये तुमच्या शरीरातील विशिष्ट दाब बिंदूंमध्ये सुया घालणे समाविष्ट आहे. सिद्ध फायदे ओळखण्यासाठी अधिक वैज्ञानिक संशोधन आवश्यक असताना, पूर्व औषधांमध्ये हजारो वर्षांपासून अॅक्युपंक्चरचा सराव केला जात आहे. निर्जंतुकीकरण सुया असलेल्या प्रमाणित डॉक्टरांनाच भेट द्या. ाँक्टर.

देवदूताची प्रचिती

आपण नेहमी हॉस्पिटल चा आजाराशी संबंध जोडला आहे.परंतु हे नेहमी चुकीचे आहे. उलट हॉस्पिटल ही अशी जागा आहे जिथे हजारो आजारी लोक येतात आणि बरे होउन जातात. ते लोक मनाने येताना निराश असतात आणि जाताना निरोगी किंवा पूर्वी पेक्षा खुप आनंदी होऊन जात असतात. त्यासाठी डॉक्टर नेहमी जोखिम घेण्यासाठी तयार असतात.

एक असा अतिशय धोकादायक आजार आहे, ज्यावर आतापर्यंत कोणताही इलाज सापडलेला नाही. उपचाराशिवाय ते एखाद्या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती गंभीरपणे कमकुवत करू शकते. इम्युनो डेफिशियन्सीमुळे होणारा हा आजार बहुतेक लोकांचे अवयव काम करणे बंद करू शकतो आणि त्याला कोणत्याही आजाराचा अगदी लगेच संसर्ग होतो.

लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये बऱ्याचदा गंभीर आजाराने ग्रस्त असणारे रुग्ण भरती होत असतात. अशातच एकदा राऊंड मारताना मला एक रुग्ण मिळाला. धोकादायक आजाराने ग्रस्त असलेल्या या रुग्णाला स्पयनल ट्यूमर देखील झाला होता. अशा एखाद्या रुग्णाची सर्जरी करणे म्हणजे केवढी ती रीस्क! साधी सुई टोचली तरी गंभीर आजार होण्याची शक्यता. परंतु रुग्णाच वय अगदीच कमी. त्याला जीवघेण्या वेदनेतून सोडवण्यासाठी कुणीतरी प्रयत्न करणं गरजेचं होतं. त्याच्या समोर त्याच सारं आयुष्य पडलं असताना डॉक्टरांनी आपल्या जीवाची पर्वा केली नाही. डॉक्टरांनी आपला पोशाख चढवला. त्यांना पाहून अगदी पुन्हा एकदा कोविड महामारीत परत गेल्यासरखच वाटलं.

संपूर्ण अंगावर प्लास्टिक चे अवरण चढवले अन् योग्य त्या प्रमाणात काळजी घेतली. त्याचे ऑपरेशन यशस्वी रीत्या पूर्ण केले. जेव्हा आपण एखाद्या आजारापुढे रोगापुढे हताश आणि निराश होऊन अक्षरश: हात टेकून देत असतो. तेव्हा ह्या अशा निराशेच्या परिस्थितीत आपल्याला एकच व्यक्ती आहे जो आशेचा किरण दाखवत असतो आणि तो व्यक्ती म्हणजे डाँक्टर.

आज आपण डाँक्टरांना देवाचा दर्जा देतो कारण तीच एक अशी व्यक्ती असते जी आपल्याला गंभीरातील गंभीर आजारातुन देखील बर करत असते. मृत्युच्या दारातुन आपल्या अथक परिश्रम आणि प्रयत्नांनी सहीसलामत घेऊन येत असते. आणि हेच काम लाईफ लाईन हॉस्पिटल आणि साऱ्या स्टाफ ने केलं होत. स्वत: ची पर्वा न करता हे ऑपरेशन यशस्वी पार पाडलं.परत एकदा लाईफ लाईन हॉस्पिटल जीवनदायिनी ठरलं!



अंकिता हर्षे
ऍडमिनिस्ट्रेटिव्ह
लाईफ लाईन हॉस्पिटल, कोल्हापूर.

Regards:
Dr Sandeep & Dr Shilpa Inchanalkar
Life line hospital, kolhapur

माणसामधला परमेश्वर

सामान्य माणसाला ‘ट्रायजेमिनल न्यूरॉल्जिया’ हे नाव जितकं अवघड तितकाच गंभीर हा आजार. ट्रायजेमिनल न्यूरॉल्जिया असह्य़ वेदनांमुळे त्याचे दुसरे नाव चक्क ‘सुसाईड डिसीज्’ असेच ठेवण्यात आले आहे!

1. अशा ह्या दुर्मिळ आजाराने एका आजोबांना ग्ग्रासले. वेदनेची तीव्रता इतकी विलक्षण होती की रुग्ण त्यावेळी बोलू शकत न्हवते. तोंड उघडणेसुद्धा अशा वेळी अशक्य होते. काळोखामध्ये आशेचा एखादा किरण दिसावा त्याप्रमाणे लाईफ लाईन हॉस्पिटल आणि डॉक्टर संदीप इंचनाळकर सरांचं नाव यांनी ऐकलं. मोठ्या आशेने डॉक्टरांची भेट घेतली. परमेश्वर डॉक्टरांना पाहून आपली व्यथा मांडली. डॉक्टरांनीदेखील आपल कौशल्य पणाला लावून आजोबांची सेवा केली. आणि हेच लाईफ लाईन हॉस्पिटल आजोबांची जीवनदायीनी ठरलं! डॉक्टर रूपी परमेश्वराच्या चरणी श्रीफळ हार अर्पण करुण आपली कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली.

2. याच पद्धतीने 1 आजी सुद्धा या आजाराने त्रस्त होत्या. त्यांना या आजाराने एवढे व्यापले होते की त्या आज्जींना एकेकाळी पाणी सुद्धा पिता येत नव्हते की साधी दात स्वछ करता येत नव्हते आणि यातच त्या डॉ संदीप इंचनाळकर सर यांचे लाईफ लाईन हॉस्पिटल बद्दल ऐकले आणि त्या ऍडमिट झाल्या आणि सर्व कौशल्यानी सरांनी त्या आजींना या वेदनेयुक्त् आजारातून मुक्त केले.

चेहऱ्याच्या नसेची जीवघेणी कळ – ट्रायजेमिनल न्यूरॉल्जिया

ट्रायजेमिनल न्यूरॉल्जिया असह्य़ वेदनांमुळे त्याचे दुसरे नाव चक्क ‘सुसाईड डिसीज्’ असेच ठेवण्यात आले आहे! पण त्यावर उपाय काय, आणि तो करतात कसा, हे जाणून घेऊया या लेखात- ‘ट्रायजेमिनल न्यूरॉल्जिया’ म्हणजे चेहऱ्यावर किंवा हिरडीमध्ये येणारी असह्य़ वेदना! ही वेदना वेगवेगळ्या प्रकारे येऊ शकते. कधीतरी अचानकच ती सुरू होते. विजेचा धक्का बसावा तशी असह्य़, टाचण्या टोचल्याप्रमाणे किंवा चेहऱ्याच्या एका भागात, डोळ्यांत तिखटाची पूड टाकल्याप्रमाणे अशी अनेक विशेषणे रुग्ण याचे वर्णन करताना सांगतात. बहुतेक वेळा चेहऱ्याच्या एका बाजूला गालावर, कपाळावर, हनुवटीवर, कानाच्या पुढे किंवा हिरडीवर एखाद्या विशिष्ट भागाला स्पर्श झाल्या झाल्या ही वेदना सुरू होते. या भागांना ‘ट्रिगर पॉइंट’ म्हणतात. गाडीतून जाताना गालाला हवेची झुळूक लागल्यास, तोंड धुताना त्या भागाला स्पर्श झाल्यास, अन्न चावताना अशा विविध निमित्तांमुळे ही कळ सुरू होते.

या कळेची (वेदनेची) तीव्रता इतकी विलक्षण असते की रुग्ण त्यावेळी बोलू शकत नाही. तोंड उघडणेसुद्धा अशा वेळी अशक्य होते. काही लोक तर ही वेदना सुरू होईल या भीतीने दिवसेंदिवस त्या बाजूचे तोंडच धूत नाहीत. या दयनीय अवस्थेत भर पडते ती औषधांमुळे! ‘कार्बामॅझेपिन’ हे औषध ही वेदना कमी करण्यासाठी सुचविले जाते. त्याने वेदनेची तीव्रता कमी होते, पण तात्पुरतीच! शिवाय आजार वाढेल तसा औषधांचा परिणामही कमी-कमी होत जातो आणि नंतर या गोळ्यांचा उपयोगच होत नाही. या गोळ्यांच्या अतिरिक्त मात्रेमुळे चक्कर येणे, ग्लानी येणे असे त्रास होऊ शकतात. यकृतावर परिणामही होऊ शकतो. थोडक्यात, औषधे नसांना आणि मेंदूला बधीर करून हा त्रास दाबतात, तो बरा करीत नाहीत.

मग या रुग्णांसाठी त्रास कायमचा नाहीसा करणारा उपाय कोणता? तर ‘एमव्हीडी’ म्हणजे ‘मायक्रोव्हॅस्क्युलर डीकॉम्प्रेशन’ ही शस्त्रक्रिया. ट्रायजेमिनल न्यूरॉल्जियाची वेदना होणाऱ्या रुग्णांच्या चेहऱ्याच्या नसेवर ती जेथे मेंदूत प्रवेश करते तेथे रक्तवाहिनीचा दाब आलेला असतो. अशा रक्तवाहिनीच्या अव्याहत स्पंदनामुळे ही नस हळवी बनते आणि ट्रायजेमिनल न्यूरॉल्जियाची असह्य़ वेदना सुरू होते.

न्यूरोमायक्रोस्कोपच्या साहाय्याने करण्यात येणाऱ्या एमव्हीडी शस्त्रक्रियेत ही रक्तवाहिनी नसेपासून दूर केली जाते आणि ती तशीच दूर राहावी म्हणून त्या दोहोंच्यामध्ये ‘टेफ्लॉन’ या पदार्थाचा स्पंज घालून ठेवला जातो. हा स्पंज कधीही विरघळत नाही. सहसा आपली जागाही सोडत नाही. ‘ट्रायजेमिनल न्यूरॉल्जिया एमव्हीडी शस्त्रक्रियेने बरा होतो हे सहा-सात वर्षांपूर्वी कळले असते, तर आयुष्यातली बहुमूल्य वर्षे वाया गेली नसती’, अशीच या आजाराच्या बहुसंख्य रुग्णांची प्रतिक्रिया असते.



डॉ_संदीप_इंचनाळकर
(न्यूरो- स्पायनल सर्जन)
लाईफ लाईन हॉस्पिटल, कोल्हापूर.

प्रसाद ची अनोखी दिवाळी

घरामध्ये ज्यावेळी लहानग्याचे बोबडे बोल घरभर घुमू लागतात त्यावेळी सारे कुटुंबच आनंददायी होत असतं. हेच लहान मुल आई-बाबांच्या जीवाभावांच्या लोकांच्या गळ्यातील ताईत होत असतं. असाच सर्वांचा लाडका असणारा एक मुलगा. त्याच्या आवाजाला जणू वरदहस्त लाभलेला. त्याच्या गळ्यातून स्वर उमटू लागले की सारे जण तल्लीन होऊन ऐकायचे. अगदी लहान वयातच गरीब कुटुंबी जन्मूनदेखील नावलौकिक मिळवलेल्या या लहानग्याचे कौतुक मात्र नियतीला मान्य नसावे. एक दिवस अचानक एका गंभीर अपघाताने त्यावर झडप घातली अन साऱ्यांच्याच स्वप्नांचा चुराडा झाला.

मुलाची गंभीर अवस्था,अपघातामुळे फ्रॅक्चर त्यात जगेल की मरेल याची नसलेली शाश्वती, घरी अठरा विश्व दारिद्र्य अन हॉस्पिटलचा खर्च या साऱ्यानेच कुटुंबीय कोलमडून पडले. त्या मुलाच्या गंभीर स्थितीमुळे कधी या हॉस्पिटल मधून त्या हॉस्पिटलमध्ये रवानगी होत राहिली पण आशेचा किरण देखील दिसत नव्हता. जस जसा वेळ निघून जात होता तशीच जगण्याची उम्मीद देखील त्यांन सोडली असावी. कुटुंबीयांनी अशातच आप्तेष्ष्टांच्कडून लाईफ लाईन हॉस्पिटलचा आणि डॉक्टर संदीप इंचनाळकर सरांच नाव ऐकलं. संध्याकाळी त्या मुलाच्या काकांनी रिपोर्ट येऊन दाखवले. डॉक्टरांजवळ सारी व्यथा मांडली. का कोणास ठाऊक त्यांना डॉक्टर रूपी देवाचे दर्शन झालं असावं. त्यांनी लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये येण्याचा निर्णय घेतला. कशाचीही पर्वा न करता आपल्या बाळाचा जीव मुठीत घेऊन हे कुटुंबीय लाईफ लाईन हॉस्पिटलच्या दारात दाखल झाले. हॉस्पिटल मध्ये आल्यावेळी तो पूर्णपणे बेशुद्ध होता. डॉक्टरांनी त्याची पाहणी करून त्यांना गंभीर त्याची जाणीव झाली आणि तातडीने त्याची रवानगी आयसीयू क्रिटिकल सेक्शन मध्ये केली.

हळूहळू वेळ सरत होती त्याच्या प्रकृतीत सुधारणा देखील होत होती. पण मध्येच कुठेतरी विश्वास ढळला जात होता. कधी चेस्ट इन्फेक्शन तर कधी फिट. कधी कधी फ्रॅक्चर मुळे देखील सारांचा जीव घाबरा घुबरा व्हायचा. Brain haemorrhage झाल्यावर तर परिस्थिती हाताबाहेर चालली की काय असंच वाटायचं! रोजचा दिवस एक चिंता घेऊन उगवायचा आणि काळजीपोटीच मावळायचा. आपल्या लेकराच्या सुखरूपतेसाठी त्याची आई आणि बहीण डोळ्यात तेल घालून त्याच्याजवळ थांबायच्या. त्यांच्या परीने शक्य असलेले सारे प्रयत्न त्यांनी केले. त्या मुलाच्या नातेवाईकांसोबतच लाईफ लाईन हॉस्पिटल मधला प्रत्येक व्यक्ती जिव्हाळ्याने, आपुलकीने त्या लहानग्याच्या सेवेत तत्पर झाला होता. त्याच्या सुखरूपतेसाठी प्रत्येकजणच ईश्वराला पूजीत होता.

बघता बघता एक-दीड महिना सरला.. मनापासून केलेल्या सेवेने, लाईफ लाईन हॉस्पिटलच्या जिद्दीपुढे नियतीने देखील हात टेकले. तो मुलगा हळूहळू डोळे उघडू लागला आपल्या जवळच्या माणसांना ओळखू लागला. मग मात्र साऱ्यांनी एकच जल्लोष केला. नातेवाईक, हॉस्पिटल कर्मचारी कोणताच भेदभाव उरला नव्हता सारे जणच त्यांच्या आनंदात सामील झाले होते. व्हेंटिलेटर बंद झाल्यानंतर हळूहळू त्याची प्रकृती सुधारू लागली. त्याच्या आवडीच्या पोवाड्याने सर्वांनाच हुरूप मिळाली.

हॉस्पिटल म्हणजे जणू त्याच्या जिव्हाळ्याचा ठिकाण बनलं. कधी चित्र काढून त्यात रंग भरून त्यांना आनंद व्यक्त केला तर कधी आपले पोवाडे ऐकवून साऱ्यांनाच पोट धरून हसायला लावलं. निरोपाच्या वेळी मात्र साऱ्यांचेच डोळे पानावले. शेवटचा निरोप घेताना डॉक्टर इंचनाळकर सर आणि लाईफ लाईन हॉस्पिटलला खऱ्या अर्थाने लाईफ लाईन म्हणायला देखील ते विसरले नाहीत. प्रसाद चे कुटुंब सगळे सण विसरून गेले होते पण अचानक एक लाईफ लाईन रुपी दिवा त्यांच्या आयुष्यात आला आणि प्रसाद चे जीवन तेजोमय झाले
आजपर्यंत च्या दिवाळी मध्ये ही दिवाळी अविस्मरणीय ठरली



अंकिता हर्षे
ऍडमिनिस्ट्रेटिव्ह
लाईफ लाईन हॉस्पिटल, कोल्हापूर.

Regards:
Dr Sandeep & Dr Shilpa Inchanalkar
Life line hospital, kolhapur

लाईफ लाईन हॉस्पिटल चा पुन्हा एकदा अटकेपर झेंडा

अत्याधुनिक सोयीसुविधा, मनामध्ये जिव्हाळा साठवलेला स्टाफ आणि अडचणीतून मुक्त झालेला पेशंट या साऱ्यांमुळेच लाईफ लाईन हॉस्पिटल हे नाव देशाच्या अगदी घरोघरी जाऊन पोहोचलं! सामान्य जनतेच्या गळ्यातलं ताईत असणार आपलं लाईफ लाईन हॉस्पिटल अजून एका यशाचा मानकरी ठरलं.

NABH म्हणजेच National Accreditation Board of Hospital And Healthcare या कार्यप्रणालीच्या सर्टिफिकेट चा तब्बल तिसऱ्यांदा मानकरी होण्याचा सन्मान लाईफ लाईन हॉस्पिटल ला मिळाला. तुमच्या या लाईफ लाईन हॉस्पिटलच्या शिरेपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला! National Accreditation Board of Hospital and Healthcare हे Quality Council of India चा एक संविधिक भाग आहे. NABH हे भारतातील गुणवत्ता परिषद चा एक घटक बोर्ड आहे जो आरोग्य संघटनांन साठी मान्यताप्राप्त कार्यक्रम स्थापित करून त्यांचे आयोजन करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. अगदी ISO दर्जाच हे सर्टिफिकेट!

एखादं हॉस्पिटल उभे राहण्यामागे अनेकांची संघर्ष असतात, कदाचित त्याहून अधिक ते हॉस्पिटल सुरळीत योग्यरीत्या चालवणं देखील कठीणच! कोणत्याही हॉस्पिटल हे त्याच्या स्टाफचं योग्य वेळोवेळी ट्रेनिंग, प्रोटोकॉलचं काटेकोर पालन अन अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा योग्य वापर यावरच अवलंबून असतं. NABH मंडळ देखील हेच पाहण्यासाठी येत असतात. NABH ची पाहणी म्हणजे जनू शाळेतील इन्स्पेक्शनच! केवढा तो उत्साह केवढी त्या तयारी!

अगदी वॉचमन पासून ते डॉक्टरांपर्यंत सर्वांनीच प्रत्येक मिनिटाचं सोनं केलं. कित्येक रात्री जागून तयारी केली. इतकं नामांकित सर्टिफिकेट म्हणल्यावर परीक्षक देखील तितकेच नामांकित असणार. या परीक्षेची उत्तरपत्रिका तपासायला जयपुरहून परीक्षकाला परीक्षक आले होते. अखेर तो दिवस उजाडला लाईफ लाईन हॉस्पिटलच्या प्रत्येक सदस्याने केलेल्या कामाचा चीज होण्याचा दिवस आला होता. प्रत्येक गोष्टीची काटेकोरपणे तपासणी केली जात होते होती. दांडी कुठेही उडणार नाही याची शाश्वती आपल्याला होतीच. सारं काही मनाप्रमाणेच झालं. परीक्षकांनी कोणते त्रुटी न काढता, सवाल न करता केवळ लाईफ लाईन हॉस्पिटल आणि डॉक्टर संदीप इंचनाळकर सरांच्या अभिमानाची ओवी गायली. कोणाच्याही आधाराशिवाय लाईफ लाईन कुटुंबीयांच्या साथीने National Accreditation Board of Hospital and Healthcare सारखा मौल्यवान दागिना आपल्या अंगी जडवून घेतला.



अंकिता हर्षे
ऍडमिनिस्ट्रेटिव्ह
लाईफ लाईन हॉस्पिटल, कोल्हापूर.

Regards:
Dr Sandeep & Dr Shilpa Inchanalkar
Life line hospital, kolhapur

लाईफ लाईन हॉस्पिटल च्या शिरपेचात मानाचा तुरा

पश्चिम महाराष्ट्रामध्ये आरोग्य क्षेत्रात केलेले योगदान याचा आढावा घेवून त्याबद्दल त्यांचा सन्मान म्हणून दै. पुढारी तर्फे देण्यात येणारा या वर्षीचा पुढारी Health Icon Award 2022 डॉ संदीप इंचनाळकर सर (Neuro Spinal Surgeon) यांना देवून त्यांचा यथोचित गौरव केलेबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन..

सन्मानास बोलताना डॉ संदीप इंचनाळकर सर यांनी सांगितले की मोठ्या हॉस्पिटलमध्ये काम करत असताना मेंदू व मणक्याच्या पेशंटला पूर्ण न्याय देणे अशक्य होत असते. त्यामुळे गरीब रुग्णांना मदत करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून हॉस्पिटल सुरू करण्याची संकल्पना पुढे आली आणि त्यातूनच 2016 मध्ये मंगळवार पेठ, कोल्हापूर या ठिकाणी 50 बेडचं भव्य लाईफ लाईन सुपरस्पेशलिटी हॉस्पिटल सुरू केले आणि हेच लाईफ लाईन हॉस्पिटल सर्वसामान्य व गरीब रुग्णांची लाईफ लाईन बनले आहे.



Regards :
Dr Sandeep & Dr Shilpa Inchanalkar
Life line hospital, kolhapur


"Because ur Life Matters"

Book Appointment/ Enquiry: 0231-2328886/87
24*7 Emergency: 9921341134
Web: https://www.lifelinebraincare.com


प्रत्येकाच्या जीवनात कधी ना कधी डॉक्टर महत्त्वाची भूमिका बजावत असतात. आपण आजारी असल्यावर, गंभीर दुखापत झाल्यावर आपल्याला सर्वप्रथम आठवण येते ती म्हणजे डॉक्टरची!
डॉक्टर आपल्याला बरे करतीलच असा विश्वास सर्वांनाच असतो.विज्ञान आणि वैद्यकीय शास्त्र यांचा खूप जवळचा संबंध आहे. रसायनशास्त्र आणि तंत्रज्ञान यांचा वापर करून अनेक प्रकारची औषधे, वैद्यकीय वस्तू आणि उपचार मशिन्स बनवल्या जातात. त्यांना योग्य पद्धतीने हाताळणारा आणि रुग्णांना योग्य औषधं देणारा असा एक व्यक्ती म्हणजे डॉक्टर!
समाजातील प्रत्येक स्तरावर प्रत्येक व्यक्तीपर्यंत डॉक्टर कार्यरत असतात.पण कित्येकदा डॉक्टरांवरतीच अनेक आरोप केले जातात. कित्येक डॉक्टरांना बदनामीला सामोरे जावे लागते. एका बाजूला देवाची उपमा तर दुसऱ्या बाजूला शिव्याशापांचे हार गळ्यात माळले जातात. पण अशातही काही रुग्ण आपली व्यथा मांडतात आणि डॉक्टर हेच खरे परमेश्वर हे सिद्ध करून जातात. अशाच एका रुग्णाची कहाणी घेऊन मी अंकिता हर्षे एका तरुण मुलाची व्यथा इंटरनॅशनल ब्रेन डे च्या निमित्ताने तुमच्यासमोर मांडत आहे. प्रत्येकाचं काही ना काही स्वप्न असतं. अशातच एक संगीतकार आणि गायक होण्याचं स्वप्न उराशी बाळगलेला एक युवक मुंबई गाठतो. काही दिवसात स्वप्न बाजूला सारून परत येतो. गावी परत येण्याला कारण म्हणजे मुंबईची दगदग किंवा संघर्ष नव्हे तर चेहऱ्याचा बदललेल रूप! चेहरा सतत विचित्र पद्धतीने हलत होता चार चौघांमध्ये बसताना देखील आत्मविश्वास खचत होता. गावाला आल्यानंतर अनेकांनी अनेक सल्ले दिले. डॉक्टर, हकीम सार काही करून पाहिलं. परंतु कशानेच दिलासा मिळाला नाही. शेवटी डॉक्टर संदीप इंचनाळकर सरांचं नाव ऐकून हा युवक लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये दाखल झाला. इथे येऊन आपल्याला रिकाम्या हातीच जावं लागेल असाच काहीसा त्याचा अविर्भाव होता. परंतु डॉक्टरांनी त्याला विश्वास दिला. आणि त्याला ऍडमिट करून घेतले. हेमिफेशियल स्पाझम या आजाराने त्याला ग्रासलं होतं. चेहऱ्याचा आकार विचित्र झाल्याने तो विद्रूप दिसत होता. संदीप सरांनी त्याला ऑपरेशनचा सल्ला दिला. ही अवघड शस्त्रक्रिया दुर्बिणीच्या माध्यमातून करून त्याला आशेचा किरण दिला. अगदी काही दिवसातच त्याला त्याच्या चेहऱ्यावरती फरक जाणवू लागला. त्याच्या चेहऱ्यावरचा स्मित हास्य सारं काही सांगून जात होतं. परमेश्वराची अनेक रूप असतात. अन डॉक्टर हे त्याचंच आधुनिक रूप असल्याची प्रचिती त्याला आली.
अंकिता हर्षे.
Administrative
Life line hospital, kolhapur.

Before

After

Clinical meeting for general practitioners

गेली 2 वर्षे कोविडमुळे क्लिनिकल मिटिंग घेणं शक्य न्हवतं , कालच बहादूर शेख नाका हॉटेल Oasis चिपळूण याठिकाणी मिटिंग पार पडली, त्यावेळी डॉ संदीप इंचनाळकर सरांनी बोलत असताना जनरल प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरकडे जर डोकं दुखी, मानदुखी , कंबर दुखीचा रुग्ण आला तर त्याला कसं हाताळायच याबद्दल योग्य मार्गदर्शन केले, तसेच पॅरॅलीसीस किंवा ऍक्सीडेन्ट मध्ये डोक्याला मार लागलेल्या रुग्णांमध्ये वेळेचं महत्त्व समजावून सांगितलं.

8 जून जागतिक ब्रेन ट्युमर दिन

'सौन्दर्य झाकलेला ट्युमर'
आज जागतिक ब्रेन ट्युमर दीन, या दिनानिमित्त नुकतीच घडलेली एका महिलेची कहाणी मी तुम्हाला सांगू इच्छिते.....
एका महिलेला 8 महिन्यापूर्वी डोक्यामध्ये गाठ झाली होती त्यांनी बाहेर कुठेतरी ऑपरेशन करून काढून घेतली पण ती परत उमटली आणि यावेळी ती गाठ खूपच मोठी झाली, होती आणि ती दिसू नये म्हणून केसामध्ये झाकण्याचा प्रयत्न त्या करत होत्या, त्यांना कुठल्या कार्यक्रमात जाणं सुद्धा अशक्य झाले होते अशावेळी लाईफ लाईन हॉस्पिटल त्यांच्यासाठी चमत्कार ठरला डॉ संदीप इंचनाळकर सरांनी MRI केला आणि ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला आणि ती गाठ मुळातून काढून टाकली आणि त्या महिलेला आजारातून कायमच मुक्त केलं विशेष म्हणजे ही गाठ 2.5kg वजनाची होती जी खाली दिलेल्या फोटोमध्ये आपल्याला बघायला मिळेल.....



Regards :
Dr Sandeep & Dr Shilpa Inchanalkar
Life line hospital, kolhapur


"Because ur Life Matters"

Book Appointment/ Enquiry: 0231-2328886/87
24*7 Emergency: 9921341134
Web: https://www.lifelinebraincare.com

#lifelinehospital #HopeForlife #NeuroSurgery #SurgeryUpdate #spinesurgerys #doctorinchanalkar #spine #Surgery #Healthcare #BrainSurgery #Neurosurgeon #BestHospital #BestNeurosurgeon #kolhapur #accident #Fitness #BrainStroke #spinesurgeonkolhapur #brainspecialist #menduspecialist #accidentcenter#emergency# flood

"अभिनव चा एक अनुभव"

नमस्कार

प्रत्येक लहान मुल कधी ना कधी खेळताना धडपडतच असतं. तेव्हा मात्र कधी छोट्या सहज भरुन निघणाऱ्या जखमा होतात तर कधी फार गंभीर. आठ वर्षांचा अभिनव आजी-आजोबांसोबत शेतामध्ये खेळण्यासाठी गेला होता. आजी-आजोबांचं लक्ष नसताना अभिनव शेती फवारणीच्या पंपाजवळ खेळत होता. अचानक ड्रोन कॅमेरा सारखा तो पंप उडून अभिनवच्या डोक्यात पडला. मेंदूची कवठी फुटून आत मध्ये गेल्यामुळे प्रचंड प्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागला. अभिनवची अशी अवस्था पाहून त्याच्या घरचे देखील भांबावून गेले. रक्ताच्या सड्यात पडलेल्या अभिनवला रात्री लाईफ लाईन हॉस्पिटल मध्ये आणले गेले. अभिनव बद्दल कळताच डॉक्टर संदीप इंचानाळकर सर हे आपली सर्व कामे बाजूला ठेवून हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. सर्वप्रथम अभिनवच्या नातेवाईकांना धीर दिला आणि काळजी न करण्याचे सांगितले. डॉक्टरांनी अभिनव वर ताबडतोब ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला. रात्रीची वेळ असल्याने अचानक आलेल्या संकटात अभिनवच्या आई-वडिलांकडून पैशांची जुळवाजुळव करण्याचे राहून गेले होते. तरीदेखील डॉक्टरांनी कशाचाही विचार न करता अभिनवच्या उपचाराला सुरुवात केली. वाढत्या रक्तस्त्रावामुळे त्या लहान मुलाच्या रक्ताची देखील सोय करून ठेवली. ऑपरेशन मध्य रात्री तीन वाजता पार पडले. ऑपरेशन झाल्यावर काहीच वेळात अभिनवला शुद्ध आली आणि त्याच्या अवस्थेतील प्रगती साऱ्यांना जाणवू लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी अभिनव सर्वांशी बोलू लागला. अभिनवच्या नातेवाईकांनी डॉक्टरांचे आणि लाईफ लाईन हॉस्पिटलचे मनापासून आभार मानले. अगदी काही दिवसात अभिनव लाईफलाईन हॉस्पिटल मधील सर्वांच्याच गळ्यातील ताईत झाला. डॉक्टर इंचनाळकर सर आणि लाईफ लाईन हॉस्पिटलच्या योग्य वेळी योग्य उपचारांमुळे अभिनव सारखा कोवळ्या वयात गंभीर दुखापत झाली असताना देखील अगदी कमी वेळेत बरा झाला.
धन्यवाद !


अंकिता हर्षे
ऍडमिनिस्ट्रेटिव्ह
लाईफ लाईन हॉस्पिटल, कोल्हापूर.

Regards :
Dr Sandeep & Dr Shilpa Inchanalkar
Life line hospital, kolhapur


"Because ur Life Matters"

Book Appointment/ Enquiry: 0231-2328886/87
24*7 Emergency: 9921341134
Web: https://www.lifelinebraincare.com

#lifelinehospital #HopeForlife #NeuroSurgery #SurgeryUpdate #spinesurgerys #doctorinchanalkar #spine #Surgery #Healthcare #BrainSurgery #Neurosurgeon #BestHospital #BestNeurosurgeon #kolhapur #accident #Fitness #BrainStroke #spinesurgeonkolhapur #brainspecialist #menduspecialist #accidentcenter#emergency# flood
अभिनव चा एक अनुभव अभिनव चा एक अनुभव

वार्षिक स्नेहमेळावा 2022

नुकताच वार्षिक स्नेहमेळावा पार पडला यामध्ये प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये चांगली कामगिरी बाजावल्याबद्दल अवॉर्डस देण्यात आले तसेच मनोरंजनाचा कार्यक्रमही उत्साहात पार पडला काही रुग्णांनी आपलं मनोगतही व्यक्त केलं, कार्यक्रमासाठी डॉक्टर , पेशंट, असा पूर्ण लाईफ लाईन परिवार उपस्थित होता शेवटी स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.....

 वार्षिक स्नेहमेळावा 2022

Dr Sandeep & Dr Shilpa Inchanalkar
Life line hospital, kolhapur


"Because ur Life Matters"

Book Appointment/ Enquiry: 0231-2328886/87
24*7 Emergency: 9921341134
Web: https://www.lifelinebraincare.com

#lifelinehospital #HopeForlife #NeuroSurgery #SurgeryUpdate #spinesurgerys #doctorinchanalkar #spine #Surgery #Healthcare #BrainSurgery #Neurosurgeon #BestHospital #BestNeurosurgeon #kolhapur #accident #Fitness #BrainStroke #spinesurgeonkolhapur #brainspecialist #menduspecialist #accidentcenter#emergency# flood

आयडॉल ऑफ महाराष्ट्र

काल नुकताच 'सकाळ' आयोजित आयडॉल ऑफ महाराष्ट्र पुरस्कार वितरण सोहळा पार पडला यामध्ये न्यूरोसर्जरी मध्ये आजपर्यंत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तसेच त्यांचे कष्ट व सामाजिक बांधिलकी यांचा सन्मान म्हणून डॉ संदीप इंचनाळकर (न्यूरो स्पायनल सर्जन) यांना आयडॉल ऑफ महाराष्ट्र या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा!!!

आयडॉल ऑफ महाराष्ट

"विश्वास- सातासमुद्रापलिकडचा "

लाईफ लाईन हॉस्पिटल नाव ऐकून अनेकदा पेशंट लांबून येत असतात.लाईफ लाईन हॉस्पिटलच्या मेडिकल सुविधा आणि सेवाभावी कर्मचारीवर्ग यांच्यामुळे येणारा प्रत्येक पेशंट बरा होऊन समाधानाने परततो. लाईफ लाईन हॉस्पिटलच नाव आता साता समुद्रापार देखील होतय याची प्रचिती आम्हाला आली. ओमान देशाचे रहिवासी असणारे एक महिला पेशंट डोकेदुखी मुळे त्रस्त होते. कठीण कोरोना काळात विसा मिळवून फक्त सल्ला घ्यावा म्हणून ते भारतात पोचले. ती आई त्यांच्या २५ मुलांपैकी ४ डॉक्टर मुले आहेत, तरीसुध्दा तिला डोकेदुखीचा होणारा प्रचंड त्रास यामुळे अनेक ठिकाणी उपचार करून देखील काहीच हाती न लागल्याने हे कुटुंब हैरान झाले होते. अशातच एकदा त्यांनीं अनेकांकडून भारतामधील लाईफ लाईन हॉस्पिटल विषयी ऐकले होते. डॉक्टर संदीप इंचनाळकर सरांची कार्यक्षमता अन लाईफ लाईन हॉस्पिटलच नाव ऐकून डोकेदुखीने त्रस्त पेशंट ओमान या देशातून भारतामध्ये आला.

मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये उपचारांऐवजी ऑपरेशन करावे लागेल हे ते जाणून होते. डॉक्टर संदीप इंचनाळकर सरांवर विश्वास दाखवून त्या रुग्णाने लाईफ लाईन हॉस्पिटल मध्ये उपचार घ्यायला सुरुवात केली. पेशंट सातासमुद्रापार असून देखील लाईफ लाईन हॉस्पिटल मध्ये त्याला सतत माणुसकीची जाणीव होत राहिली. 'अतिथी देवो भव' अशी शिकवण देणारी आपली भारतीय संस्कृती लाईफ लाईन हॉस्पिटलने योग्य रित्या सांभाळली. नेहमीप्रमाणेच लाईफ लाईन हॉस्पिटल कधीच विश्वासाला तडा जाऊ देत नाही. भारतात येऊन बरं होण्याची आशा घेऊन आलेला हा रुग्ण ऑपरेशन न करताच सरांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या योग्य उपचाराखाली कमी कालावधीतच बरा झाला. सरांचे योग्य मार्गदर्शन आणि कर्मचाऱ्यांनी केलेली सेवा त्याने तो भारावून गेला होता. उपचार संपल्यावर त्या २-३ दिवस विसा शिल्लक असल्या कारणाने कोल्हापुर दर्शन करुन मायदेशी परतल्या, पण तो रुग्ण जाताना मात्र साऱ्यांशीच एक नाते जोडून गेला. कोल्हापुर आता एक आंतरराष्ट्रीय मेडिकल हब झालेल आहे अशी प्रतिक्रिया देऊन गेले. सातासमुद्रापार गेलेल्या या रुग्णांने लाईफ लाईन हॉस्पिटल सोबत नाळ कधी तुटू दिली नाही.

लाईफ लाईन हॉस्पिटलच्या योग्य उपचार अन प्रेमाने भारावून गेलेल्या त्या पेशंटच्या अनुभवानंतर त्याचे अनेक नातेवाईक लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी भारतामध्ये आले. डॉक्टर संदीप इंचनाळकर सरांनी दिलेला विश्वास, कर्मचाऱ्यांची आपुलकी, जिव्हाळा आणि प्रेम हे सार काही त्यांना परत येण्यामागचं कारण ठरल. लाईफ लाईन हॉस्पिटल मध्ये येणारा प्रत्येक रुग्ण हा या लाईफ लाईन परिवाराचा होऊन जातो. जाती- धर्म, देश-विदेश कोणत्याही सीमा न बाळगता 'रुग्ण सेवा हिच ईश्वर सेवा' मानून, लाईफ लाईन हॉस्पिटल आपल कर्तव्य बजावत असते.
धन्यवाद


सौ.अंकिता हर्षे
लाईफ लाईन ट्रॉमा , ब्रेन ऍन्ड स्पाईन सेंटर, कोल्हापूर

"Because ur Life Matters"

Book Appointment/ Enquiry: 0231-2328886/87
24*7 Emergency: 9921341134

कंबरदुखी पासून मुक्त होऊया पुढील आयुष्य वेदनामुक्त जगुया

......आपल्याकडे 3 रुग्ण जे कंबरदुखीने खूप जास्त त्रस्त झाले होते भरपूर ठिकाणी त्यांनी उपचार केला पण औषध घेतलं की तेवढ्यापुरतेच बरं वाटायचं आणि परत दुखणं चालू मग मॉलिश करणे, वजन लावणे हे प्रकार पण अवलंबले पण काहीच उपयोग नाही झाला , हळू हळू त्रास वाढत चालला मग त्यांना एक बाजूचा पाय खूप दुखणे व मुंग्या येणे, चालताना बसायला लागणे, पायातील चप्पल निसटने , शिंकताना कमरेत कळ येणे, पाय सुन्न वाटणे हा त्रास सुरू झाला त्यामुळे कोणत्या नातेवाईकांनकडे सुद्धा जाणं त्यांना जमत न्हवते. मग एक दिवस त्यांना आपल्याकडेच बरा झालेल्या एका पेशंटने लाईफ लाईन हॉस्पिटल डॉ संदीप इंचनाळकर यांचा पत्ता दिला सरांनी पेशंट बघितला आणि शस्त्रक्रिया (ऑपरेशन) करायला लागेल असा सल्ला दिला पण शस्त्रक्रिया केल्यावर माणूस अधू होतो असा त्यांचा गैरसमज होता पण डॉ इंचनाळकर यांनी आपण कमीत कमी छिद्रातून दुर्बिणीद्वारे करत असलेल्या शास्त्रक्रियेबद्दल सांगितले तेंव्हा त्यांना थोडा धीर आला तसेच त्यांच्यासारखाच त्रास असणारे शस्त्रक्रिया झालेले 2 पेशंट आपल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते , त्या दोन रुग्णांना ते भेटले त्यांच्याशी चर्चा केली व त्यांचा आत्मविश्वास खुपच वाढला आणि अखेर पेशंट शास्क्रियेसाठी तयार झाला आणि शस्त्रक्रियेच्या अगदी दुसऱ्याच दिवशी पेशंटच्या आयुष्यात चमत्कार झाला आणि पेशंट पूर्ववत चालायला लागला. म्हणजे इतक्या वर्षाचा त्रास फक्त एकच दिवसात पूर्णतः बरा झाला आणि तेही कमीत कमी खर्चात. आजपर्यंत लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये 500 रुग्णांना कंबरदुखी पासून मुक्तता मिळाली आहे. आणि हा चमत्कार खाली दिलेल्या pre operative आणि post operative विडिओ मध्ये आपण पाहू शकता

Before

After

Before

After

Before

After

"लाईफ लाईन मुळे रुग्णाला मिळाला पुनर्जन्म... "

Brain injury month awareness च्या निमित्ताने एक ज्वलंत उदाहरण घेऊन आपल्या समोर पुन्हा एकदा मी आले आहे.

नमस्कार मी अंकिता हर्षे. गोष्ट एका तरुणाची , वय वर्ष केवळ 28 ,अगदी तारुण्यातील एक तरुण संदीप शिवाजी पाटील एका गंभीर अपघात होऊन लाईफलाईन हॉस्पिटल मध्ये दाखल झाला. बेशुद्धावस्थेत, रक्ताने कपडे माखलेले, सर्व नातेवाईक खूप भयभीत झालेले अशी ती वेळ. मेंदूचा स्कॅन केला मेंदूमध्ये हाड घुसलं असल्याचं निदान डॉक्टरांनी केलं. सार्‍या कुटुंबियांसोबतच नातेवाईक, आप्तेष्ट अन अशा बिकट परिस्थितीने ग्रासलेले सारेजण चिंतेत पडले. परंतु लाईफ लाईन हॉस्पिटल चे डॉक्टर संदीप इंचनाळकर (neurosurgeon )सरांनी सगळ्यांना आधार दिला. पहिलं ऑपरेशन यशस्वीरित्या पार पडलं , तोपर्यंत एक नवीन आजार उद्भवला असा की, नाकातून मेंदूचे पाणी यायला लागले आणि दुसरं ऑपरेशन करण्याची वेळ आली आणि Endoscopic तंत्रज्ञान वापरून glue च्या सहाय्याने मेंदूतील पाणी नाकावाटे सील करण्याची शस्त्रक्रिया(CSF rhinorrhea ). ENT surgeon, Neurosurgeon, आणि भुलतज्ञ यांच्याकडून यशस्वीरीत्या पार पडली. त्यातच दोन ऑपरेशन नंतर पुन्हा एकदा संदीप ला नव्या संकटाला सामोरे जावे लागले, चेस्ट मध्ये इन्फेक्शन झाल्याचे समजले, सारेजण पुन्हा एकदा काळजीत पडले, पण chest physian डॉक्टरांचा लगेच सल्ला मिळाला आणि आरोग्याविषयी येणाऱ्या अनेक अडचणीत मार्ग काढत डॉक्टरांनी सुखरूप वाचवले.. सगळं झाल्यानंतर जेव्हा मी नातेवाईकांना प्रतिक्रिया विचारली तर ते एकच सांगितलं की, covid-19 च्या संकटकाळातही फिजिशियन, सर्जन, सर्व हॉस्पिटल टिम नि योग्य ते उपचार करत नव जीवनदान दिले. हॉस्पिटलच्या बिलाचं वाजवी ओझं नातेवाईकांवर न लादता हॉस्पिटलने मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेच दार उघडून दिल. हॉस्पिटलने सवलत देऊन मदत केली. असं म्हटलं जातं की डॉक्टर हे देवाचं रूप आहेत, लाईफ लाईन हॉस्पिटल मध्ये घालवलेल्या एक महिन्याच्या कालावधीमध्ये खरच माणुसकी म्हणजे काय याची प्रचिती आली असे उदगार जेव्हा येतात तेव्हा खरच कुठेतरी एव्हरेस्ट शिखर सर केल्याची प्रचिती येते. लाईफ लाईन हॉस्पिटल ही खऱ्या अर्थाने संदीप ची लाईफ लाईन ठरली. अशा अवघड परिस्थिती पेशंट चा भाऊ आणि त्यांच्या सर्व नातेवाईकांनी हॉस्पिटल वर टाकलेला विश्वास आणि आम्हाला दिलेली साथ ही खूप कौतुकास्पद आहे. आणि तब्बल एक महिन्याच्या अथक परिश्रमा नंतर संदीप त्याच्या जीवनाची लढाई यशस्वीपणे जिंकून कालच घरी परतला.

एक सुजाण नागरिक म्हणून एक सांगते की योग्य ठिकाण, योग्य उपचार, योग्य सल्ला या तीन गोष्टींबरोबर तुम्हा सर्वांना एक आवाहन करते की हेल्मेट चा वापर, मद्यपान करून गाडी चालवणे टाळा.
धन्यवाद! .


सौ.अंकिता हर्षे
लाईफ लाईन ट्रॉमा , ब्रेन ऍन्ड स्पाईन सेंटर, कोल्हापूर

 एक अविस्मरणीय भेट......

"Because ur Life Matters"

Book Appointment/ Enquiry: 0231-2328886/87
24*7 Emergency: 9921341134

" एक अविस्मरणीय भेट...... "

          आज डॉक्टर्स डे च्या निमित्ताने डॉक्टरांचा सन्मान करण्यासाठी जमलो आणि तेवढ्यातच एक काका एक पत्र आणि एक कविता घेऊन डॉक्टरांकडे आले. आणि म्हणाले लाईफ लाईन हॉस्पिटल नावाप्रमाणेच साऱ्या रुग्णांसाठी लाईफ लाईन ठरत आहे. आणि मग हे कळलं की हे मनोगत होत खामकर दाम्पत्याचा. अवघड दुर्मीळ शस्त्रक्रिया, उत्तम आरोग्य सेवा या साऱ्यांचा वसा जपत यशाचे शिखर आम्ही गाठत आहोत. याच दरम्यान श्री खामकर त्यांच्या पत्नी सौ जयश्री, मित्र श्री विश्वंभर कुलकर्णी यांच्या समवेत 1 जून 2020 रोजी सायंकाळी सहा वाजता लाईफ लाईन हॉस्पिटल मध्ये दाखल झाले. गेले एक-दीड महिने डोळे व डोके दुखीने ग्रस्त होत्या. डोळ्यांच्या डॉक्टरांकडून उपचार घेऊन देखील प्रकृतीत सुधारणा न झाल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सिटी स्कॅन करण्यात आले. त्यानुसार रिपोर्टमध्ये डोक्यात क्रिकेट च्या चेंडूच्या आकारएवढा ट्युमर असल्याचे निदान झाले. त्यात चेंडू सारखी गाठ आणि ठणठणीत चालत येणाऱ्या पेशंट वर करावी लागणारी शस्त्रक्रिया हे एक आव्हानच . अकस्मात ओढवलेल्या ट्युमर च्या या संकटाने खामकर दाम्पत्य अतिशय भयभीत झाले होते. मृत्यूशी झुंजच जणु ती! लाईफ लाईन मध्ये दाखल झाल्यानंतर सर्वप्रथम डॉक्टर या नात्याने त्यांना धीर देण्यात आला. शस्त्रक्रिया करणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले. त्यांच्या आप्तेष्टांच्या सल्ल्यानुसार लाईफ लाईन हॉस्पिटल च्या उत्तम दर्जाच्या सुविधांमुळे शस्त्रक्रिया लाईफ लाईन हॉस्पिटल मध्येच करण्याचे निश्चित करून जयश्रीताई हॉस्पिटल मध्ये दाखल झाल्या. डोक्यात ट्युमर सारखी सूक्ष्म अवघड शस्त्रक्रिया दिनांक 4 जून रोजी तब्बल 6 तास ही शस्त्रक्रिया पार पडली. चार दिवसांच्या कालावधीत अतिदक्षता विभागामध्ये असतानाच जयश्रीताई बोलू चालू लागल्या. अन सर्वांची चिंता मिटली. भयभीत झालेले खामकर दांपत्य चिंतामुक्त झाले होते. आणि लाईफ लाईन मधील सेवांचा अभिप्राय देताना तोंड भरून कौतुक देखील केले.

         श्री खामकर यांनी जीवनामध्ये इतरांच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन आपला स्वार्थ साधणे अनेक डॉक्टर पाहिले होते, परंतु रुग्णाला अन नातेवाईकांना अवाजवी भीती न घालता वास्तव परिस्थितीचे भान देऊन शस्त्रक्रिया करणारे डॉ. संदीप इंचनाळकर सर परमेश्वर रुपी भेटल्याचा त्यांना आनंद गगनात मावेनासा झाला होता. डॉक्टरांचे कौशल्य, मनमोकळा स्वभाव स्पष्टवक्तेपणा यांनी ते भारावून गेले होते. डॉक्टर सोबतच त्यांच्यावर काळजी चे छत्र धरणारा हॉस्पिटल स्टाफ बद्दल सांगायला देखील ते विसरले नाहीत. निस्वार्थी सेवाभावी स्वभाव, कर्तव्यदसंवेदनशीलता हे सारं काही खामकर दाम्पत्यांना आपलेसे करणारे होते. हॉस्पिटल मधील अत्ययावध सुविधा, कुशल स्टाफ, हॉस्पिटल मधील वात्सल्यामुळे खामकर दाम्पत्य देखील इतर रुग्णांप्रमाणे सर्वांचे आभार मानत लाईफ लाईन हॉस्पिटल चे गोडवे गात घरी परतले.
सौ.अंकिता हर्षे
लाईफ लाईन ट्रॉमा , ब्रेन ऍन्ड स्पाईन सेंटर, कोल्हापूर

 एक अविस्मरणीय भेट......

"Because ur Life Matters"

Book Appointment/ Enquiry: 0231-2328886/87
24*7 Emergency: 9921341134

" चार वर्ष - लाईफ लाईन च्या उत्तुंग यशाची "

          पाय असणारे तर सगळेच चालतात आवश्यकता असते ते उत्तुंगतेकडे लक्ष्य ठेवून वाटचाल करणाऱ्यांची. बहिरेवाडी मध्ये एका अन्नदात्याच्या घरी जन्मलेला हा सर्वसामान्य मुलगा. घरातील आर्थिक परिस्थितीशी झुंजत स्कॉलरशिप मिळवून शिक्षण घेत राहिला. असं म्हणतात की स्वप्नांना मूल्य नसतं, न्यूरोसर्जन होण्याचे स्वप्न उराशी बाळगून कठीण वाटेवर वाटचाल करीत राहिला. घरच्या बिकट परिस्थितीमुळे शेतीदेखील विकणे भाग पडलं, पण स्वप्नांना तडा जाऊ दिला नाही.

          या साऱ्याच सार्थक झालं अन मुंबईमध्ये न्यूरोसर्जन म्हणून काम करीत असताना जपानला जाण्यासाठी सुवर्णसंधी चालून आली. पण काही माणसं कितीही मोठी झाली तरी आपल्या मातीला कधीच विसरत नाहीत याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे डॉ. संदीप इंचनाळकर ... ज्या मातीत आपण वाढलो त्या लोकांसाठी काहीतरी करण्याची त्यांची जिद्द होती. 2008 सालीच जिल्ह्यात एका नव्या ध्येयानिशी प्रवेश केला. डी वाय पाटील, वालावलकर, सिद्धगिरी सारख्या ट्रस्ट हॉस्पिटलमध्ये आणि इतकाच नव्हे तर कोल्हापुरातील ॲस्टर आधार, ॲपल सरस्वती, ॲपेक्स सारख्या नामवंत हॉस्पिटल मध्ये प्रथमच मेंदू व मणका रोग विभाग सुरू केला. तब्बल आठ वर्षांची ती अहोरात्र मेहनत सार्थकी लागली आणि लाईफ लाईन हॉस्पिटल सारख्या 50 बेडच्या प्रशस्त हॉस्पिटलची स्थापना झाली. अतिशय कठीण असणाऱ्या जटिळ गाठीच्या शस्त्रक्रिया, मेंदूच्या दुर्मीळ शस्त्रक्रिया, रक्तवाहिन्यामधील फुगे, मणक्याचे विविध आजार त्यामधील गाठी इतकेच नव्हे तर रुग्णांना जागे ठेवून कठीण शस्त्रक्रिया देखील या लाईफ लाईन हॉस्पिटल मध्ये पार पाडल्या जात आहेत. या कामगिरी साठी शाहू सन्मान पुरस्कार, करवीर रत्न पुरस्कार यासारखे बहुमूल्य पुरस्कारानी सन्मानित करण्यात आलं. हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असणाऱ्या अत्याधुनिक सोयीसुविधा, सर्व तंत्रज्ञानयुक्त ऑपरेशन थिएटर, अतिदक्षता विभाग, फिजिओथेरपी विभाग, 24 तास सज्ज असणारी ॲम्ब्युलन्स सेवा, रुग्णसेवेसाठी अहोरात्र झटणाऱ्या डॉक्टर व स्टाफ वर्ग या साऱ्यांमुळे हॉस्पिटल रुग्णांची नावाप्रमाणेच जीवनदायीनी ठरले आहे.

         हॉस्पिटल उभे केल्यानंतर येणाऱ्या संकटावर पाय देऊन बारा वर्षांचे अथक परिश्रम, आई-वडिलांचे आशीर्वाद, ईश्वराचा दर्जा देत केलेली रुग्णसेवा, घरच्यांनी दिलेली वेळोवेळी साथ , कुशल कर्मचारी वर्ग या साऱ्यामुळे अवघ्या चार वर्षात Just Dial अन Google वर best ratings, ISO, NABH सारखी उच्च नामांकन मिळवणं शक्य झालं.

लाईफ लाईन च्या उत्तुंग यशाची

रुग्णसेवेचा अखंड प्रवासात जोडले गेलेले रुग्ण, हितचिंतक यामुळे सामान्य पासून असामान्य असा अखंड प्रवास सुरू आहे.

         "फक्त आणि फक्त तुमच्या जीवनासाठी " ( Because Your Life matters )" या उक्तीप्रमाणे लाईफ लाईन हॉस्पिटल नावाप्रमाणे साऱ्यांसाठी लाईफ लाईन ठरत आहे. या चार वर्षांच्या यशस्वी प्रवासामध्ये तुम्हा सर्वांचं सहकार्य हे अनमोल आहे असच प्रेम सदैव राहूदे. डॉ संदीप आणि डॉ शिल्पा इंचनाळकर यांनी 2016 ला लाईफ लाईन हे रोपटं लावलं होतं त्याच आज वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे आणि या वृक्षाची सगळे मिळून जोपासना करूया...

"Because ur Life Matters"

Book Appointment/ Enquiry: 0231-2328886/87
24*7 Emergency: 9921341134

COVID-19 Annoucement

सध्या भारतात सर्वत्र COVID-19 या कोरोना जंतूंचा सौंसर्ग वाढला आहे आणि कोल्हापूर मध्ये सुद्धा नवीन रुग्ण सापडत आहेत त्यामुळे याचा प्रसार थांबवण्यासाठी सगळीकडेच लॉकडाऊन आहे पण हॉस्पिटल ही एक आत्त्यावशक सेवा आहे आणि मेंदू आणि मणक्याच्या आजारामध्ये वेळेला फार महत्व आहे म्हणून आशा रुग्णांवर ताबडतोब उपचार करणं गरजेचं असतं तसेच रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हा माणुसकीचा भाव जपत आम्ही लाईफ लाईन ट्रॉमा,ब्रेन अँड स्पाईन सेंटर, कोल्हापूर या ठिकाणी 24 तास इमर्जन्सी सेवा (अंतरुग्ण विभाग)सुरू ठेऊन रुग्णांवर उपचार करत आहोत .

बाह्यरुग्ण(OPD) विभाग सकाळी 11 ते 2 या वेळेमध्ये सुरू राहील.

नियम-
1) बाह्यरुग्णामध्ये दररोज 10 रुग्ण तपासले जातील
2) अपॉइंटमेंट घेतलेल्या रुग्णांना प्राधान्य.
3) अपॉइंटमेंट शिवाय रुग्ण तपासले जाणार नाहीत.
4) एका रुग्णासोबत एक नातेवाईक
5)प्रत्येकाने मास्क चा वापर करणे अनिवार्य
6) ज्यांना ताप, सर्दी व खोकला असल्यास CPR ला दाखवणे

For Appointment

अपॉइंटमेंट घेण्यासाठी खाली दिलेल्या नंबर वर कॉल करू शकता. Hospital : 9921341134
अंकिता हर्षे : 7776829767
रणजीत पाटील : 9561563003
सुनील फाले : 7058493515
विशाल आडावकर : 9011967197
वैभव सावंत : 8975682973
अरुण चव्हाण : 9766568787

COVID-19 Annoucement

Life Line Trauma, Brain & Spine Hospital, Kolhapur

Life Line Trauma, Brain & Spine Hospital, Kolhapur

Dr. Sandeep Inchanalkar, Born on 7th may 1978 , in a village called "Bahirewadi" in the vicinity of Kolhapur. Dr. Sandeep's parents realized his academic talents at an earlier age, so they decided to shift him to Mumbai for further education. Those were the days of struggle, as Dr. Sandeep's father was the only earning member working as a government officer. Despite those challenges, Dr. Sandeep did basic schooling from military school, got scholarship and took admission in a good college. Through the merit he has secured a MBBS seat in MGM medical college, and came out with flying colors. Secured distinction every year. Biochemistry distinction in first year, Microbiology in second year, and ENT, Ophthalmology in final year. But he started developing special interest in surgery, and started preparing for the common entrance.

Dr. Sandeep was lucky to crack the exam in first attempt and got into M.S. General Surgery at VM medical college Solapur. Did lot of work in general surgery in those three years, he stood second in the university in the exams. Then developed liking for Neurosurgery, again he was lucky to crack the entrance for super specialty and took Neurosurgery in Bombay hospital under guidance of Dr. K E Turel.

Now practising in Kolhapur for the last 8 years in the field of neurosurgery, worked in almost all the hospitals in Kolhapur and started neurosurgery departments in all the big hospitals of Kolhapur. I am the first neurosurgeon to do more than 5000 operations in a short span, and experience of doing almost all the latest Brain and Spine operations at an early age. He started Aneurysm treatment by both approaches ( coiling and clipping) in Kolhapur, and Awake craniotomy for the first time in the history of Kolhapur. Removed biggest Brain Tumor in D Y patil hospital Kolhapur.

Dr. Sandeep Inchanalkar have done lot of charitable work in Walawalkar hospital, D Y Patil hospital, Siddhagiri Hospital in these years First time in the history of Kolhapur neurosurgery , as a organising secretary arranged a successful state neurosurgery conference in Kolhapur.

"लाईफ लाईन हॉस्पिटल - आशेचा नवा किरण यशाच "

          नमस्कार मी अंकिता. हॉस्पिटलमध्ये 3 महिन्याचं एक लहान बाळ ऍडमिट झाले . त्या बाळाच्या जवळ जाताना काहीतरी विलक्षण असल्याची जाणीव झाली. त्या लहानशा बाळाचं डोकं काहीसं मोठं असल्याचं समजलं. त्या बाळा जवळच त्याचे धास्तावलेले आई बाबा आणि आजी होते. त्यांची विचारपूस करताना समजलं की काही दिवसांपूर्वी पुण्यात केलेली सर्जरी पूर्णतः अयशस्वी झाली होती. मग मात्र माझ्या मनात अनेक विचार येऊ लागले. अवघ्या तीन महिन्याच्या बाळाच्या मेंदूचे ऑपरेशन करणे कितपत शक्य आहे? जे पुण्यात होऊ शकले नाही ते येथे तरी कसे होईल.. जर आपल्या इथे पण ते यशस्वी नाही झाले तर? अशा एक ना अनेक प्रश्नांनी मला भेडसावून सोडले होते. असे अनेक प्रश्न मनात असताना मी आमचे सर डॉ. संदीप इंचनाळकर यांची भेट घेतली त्या बाळाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी मी कासावीस झाले होते. सरांशी बोलताना समजले त्या बाळाला Hydrocephalus ( मेंदु मध्ये पाणी जमा होणे) नावाचा एक आजार जडला होता. सरांशी बोलत असताना मी माझ्या मनातली भीती सरांना व्यक्त केली. सरांनीही मला त्या आजाराविषयी आणि सर्जरी विषयी अधिक माहिती दिली. डॉक्टरांनी मला या सर्जरी मधील असणाऱ्या जोखमा विषयी देखील सांगितले. सर्वात मोठे आणि महत्वाची जोखीम म्हणजे सर्जरीच्या वेळी बाळाच्या शरीराचे तापमान स्थिर ठेवणे. कमीत कमी रक्तस्राव होऊ देणे. अन सर्वात कठीण म्हणजे भूल दिल्यानंतर लवकरात लवकर बाळ शुद्धीवर येणे. त्या बाळाचं कुटुंब अधिक आशेने लाईफ लाईन हॉस्पिटल मध्ये आले होते. त्यात जोखीमा खांद्यावर घेऊन डॉक्टर संदीप सरांनी ही जोखीम पार पाडली. काही तासात सर्जरी सुखरूपपणे पार पडली. काही वेळातच ते बाळ शुद्धीवर आले. काही दिवसांनी त्या बाळाचं डोकं नेहमीसारखा दिसू लागलं, ते बाळ अगदी सुदृढ बाळा सारखा दूध पिऊ लागले, हसू खेळू लागले. त्या बाळाच्या आजी अन् आईचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. त्या साऱ्यांनीच डॉ. संदीप इंचनाळकर यांचे आभार मानले. आजारांनी ग्रासलेल्या अनेकांच्या जीवनात लाईफ लाईन हॉस्पिटल पुन्हा एकदा आशेचा किरण घेऊन आले होते.
अंकिता हर्षे
( ऍडमिनिस्ट्रेटर) लं.


Hydrocephalus म्हणजे काय?
Hydrocephalus and VP Shunt Procedure

व्ही पी शंटचा वापर आपल्या मेंदूतून अतिरिक्त सेरेब्रोस्पाइनल फ्लुइड (CSF) म्हणजेच मेंदूभोवतीचे पाणी काढून टाकण्यासाठी केला जातो. सीएसएफ हा एक द्रव आहे जो आपल्या मेंदूत आणि पाठीच्या माणक्याभोवती असतो ज्याच्यावर मेंदू आणि मणका तरंगत असतो.

लाईफ लाईन हॉस्पिटल - आशेचा नवा किरण यशाच

हे आपल्या मेंदूतल्या व्हेंट्रिकल्स (पोकळ रिक्त जागा) मध्ये असते. उशीसारख कार्य करत CSF आपल्या मेंदू आणि पाठीचा मणका सुरक्षित ठेवण्याचे काम करते. तथापि, जेव्हा आपल्या मेंदूमध्ये CSF जास्त प्रमाणात वाढते तेव्हा ते आपल्या मेंदूत आणि कवटीवर दबाव आणते. अतिरिक्त सीएसएफ द्रवपदार्थ वेगवेगळ्या गोष्टींमुळे उद्भवू शकतो, जसे की ब्रेन ट्यूमर किंवा जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हा ते येऊ शकते. हे अतिरिक्त द्रव आपले व्हेंट्रिकल्स देखील मोठे वाढवते . लहान मुलांमध्ये हा आजार जास्त आढळतो म्हणून लहान मुलांमध्ये काहीवेळेला डोकं खूप जास्त मोठं दिसतं याला ( Hydrocephalus ) म्हणतात. म्हणूनच आपल्या मेंदूतून अतिरिक्त सीएसएफ काढून टाकण्यासाठी आपल्या डोक्यात एक. VP Shunt (विशिष्ट प्रकारची पाईप) ठेवली जाते. व्हीपी शंट आपल्या मेंदूतून द्रव बाहेर काढून आपल्या पोटात सोडले जाते, जिथे ते आपल्या शरीरात शोषले जाते. हे आपल्या मेंदूचा दबाव आणि सूज कमी करते आणि रुग्ण बरा होतो. लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये आशा शस्त्रक्रिया नेहमीच होतात..

डॉ संदीप इंचनाळकर

(न्यूरो-स्पायनल सर्जन)

Case Study - Pituitary Tumours

Removed the big iron piece
  • Removed the big iron piece
Removed the big iron piece
  • Removed the big iron piece
Removed the big iron piece
  • Removed the big iron piece
Removed the big iron piece
  • Removed the big iron piece

Pituitary Tumours

These are brain tumours found at the base of skull, they present with headache, visual disturbance and hormonal problems. They are diagnosed by CT or MRI brain And visual or hormonal test They are removed by surgery. We at lifeline hospital remove them endoscopically through nose, it gives faster recovery It is one of the advances in neurosurgery. Last week we removed three such large brain tumours ( pituitary), all patients doing well, with the help of government scheme, with minimal expenses.
These are mri pictures and operative video.
Dr Sandeep Inchanalkar
(Neurospinal surgeon) LIFE LINE HOSPITAL KOLHAPUR.

New & Event Update

Movement disorder of neck

Movement disorder of neck या आजारावर डॉ. संदीप इंचनाळकर (न्यूरोसर्जन) यांनी लाइफलाईन रुग्णालयात यशस्वी उपचार केले.
"Movement disorder " या शब्दाचा अर्थ मज्जासंस्था (न्यूरोलॉजिकल) यांचा समूह आहे ज्यामुळे असामान्य हालचाली होतात, जे ऐच्छिक किंवा अनैच्छिक असू शकतात. Movement disorder या आजारामुळे मानेच्या कमी किंवा हळू हालचाली होऊ शकतात. Cervical dystonia या अवस्थेत मानेच्या स्नायूंमध्ये आकुंचनपणा येतो ज्यामुळे मान वेगवेगळ्या मार्गांनी वळते.१९

Medical Tourisom

Medical Tourism In Kolhapur
Karnataka Aarogya Yojana
Go to top of page