Events
' सहल एक आनंददायी प्रसंग.... '
लाईफ लाईन हॉस्पिटल संचलित जनजागृती अभियान....
डॉ संदीप इंचानाळकर हे आपल्या कर्मचारी वर्गासोबत एक वेगळा अनुभव घेण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतात आणि त्यातूनच आपल्या लोकांना प्रोत्साहन देतात... दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आम्ही सहलीचा बेत आखला आणि ठिकाण ठरले दांडेली, कर्नाटक.
मग काय नेहमी प्रमाणे आम्ही सकाळी लवकर निघायचे ठरवले आणि त्याप्रमाणे आम्ही निघालो. जाताना गाडीमध्ये गाण्याच्या आवाजावर डान्स करत एन्जॉय सुरू झाला मध्येच थोडा चहा नाष्टा केला. हे सर्व करत करत आम्ही दुपारी दांडेली मध्ये पोचलो. तिथे आम्ही 1 छानसे रिसॉर्ट बुक केले तिथे गेल्यानंतर आम्ही दुपारचे जेवण करून आम्ही काली नदीमध्ये बोटिंग, कायकिंग, झोरबिंग आणि सर्वात महत्वाचे आणि ज्या गेम साठी दांडेली ला जातो तो म्हणजे rafting गेम हे करण्यासाठी गेलो. तिथे सगळ्या स्टाफ नी सर्व गेम चा आणुभव आणि आनंद घेतला. विशेष म्हणजे लेडीज स्टाफ ने सुद्धा अगदी धाडसी वृत्तीने या सर्व गेम चा अनुभव घेतला.
त्यांनतर आम्ही रात्री 7 वाजता रिसॉर्ट मध्ये पोहचलो त्यानंतर तेथील rain dance चा सुद्धा आनंद घेतला. सर्व आटोपून आम्ही जेवण केलं आणि मग शेवटी आम्ही कॅम्प फायर कडे वळलो. तिथे मग भरपूर धमाल केली. कोणी गाणी म्हणली कोणी नक्कल करून दाखवली कोणी जोक्स सांगितले तर कोणी आपल्याला आलेले अनुभव शेअर केले आणि विशेष म्हणजे यामधे स्वतः डॉ संदीप इंचानाळकर सर सहभागी होते. त्यादिवशी पूर्ण दिवस आणि मध्य रात्र गेली हे सर्व करण्यामध्ये.
दुसऱ्यादिवशी सकाळी नाश्ता केला आणि परतीचा प्रवास सुरू झाला यावेळी येताना आम्ही crocodile park ला भेट दिली. या प्रकारे आम्ही दोन दिवस सहलीचा सुखद अनुभव घेतला...
'अपघातानंतरचा एक तास रुग्णासाठी महत्वाचा श्वास या विषयावर मार्गदर्शन'
महामार्ग उजळाईवाडी, कोल्हापूर शाखेच्या वतीने दि.11 जानेवारी 2020 ते दि. 17 जानेवारी 2020 या कालावधीत रस्ते वाहतुक सुरक्षा व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याचा औपचारिक सांगता समारंभ सोहळा दि. 17 जानेवारी 2020 रोजी पार पडला. या कार्यक्रमात डॉ. संदीप इंचनाळकार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डॉ. संदीप इंचनाळकार यांनी "अपघातानंतरचा एक तास रुग्णासाठी महत्वाचा श्वास" या विषयावर मार्गदर्शन केले.
'राजर्षी शाहू सन्मान पुरस्कार - डॉ. संदीप इंचनाळकर (वैद्यकीय क्षेत्र)'
अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे आयोजित 'राजर्षी! छत्रपती शाहू महोत्सवा'ची रविवारी । विविध मान्यवरांना 'राजर्षी शाहू सन्मान पुरस्कारा' देऊन सांगता झाली. प्रेमकुमार माने (औषध निर्माण), भारत खराटे (शिक्षण), डॉ. संदीप इंचनाळकर (वैद्यकीय क्षेत्र), संग्राम पाटील (उद्योग), प्रा. शिवाजीराव भुकेले (संत विचार) यांचा राजर्षी शाहू महाराज यांची प्रतिमा, मानपत्र देऊन! सत्कार झाला.
लाईफ लाईन हॉस्पिटल संचलित जनजागृती अभियान....
मेंदू आणि मणक्याचे आरोग्य कसे राखाल? पॅरालिसिस व मणक्याच्या आजाराबद्दलचे समाजातील समज- गैरसमज तसेच या आजारापासून कसे दूर राहायचे? या विषयांवर प्रबोधनात्मक व्याख्यान, गोखले कॉलेज कोल्हापूर येथे यशस्वीरीत्या पार पडले. या निमित्त तेथील सर्व कर्मचारी, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वक्ते : डॉ. संदीप इंचनाळकर (न्यूरो-स्पायनल सर्जन) लाईफ लाईन हॉस्पिटल (ट्रॉमा, ब्रेन अँड स्पाइन सेंटर), कोल्हापूर.
Kolhapur Flood 2019 - "Because your Life Matters"
Life line hospital Dr Sandeep and Dr Shilpa Inchanalkar taking initiative to offer small help in flood affected people to stand their own.
Doctor's Day - 1 July 2019
World Brain Tumor Day - 8 June
ब्रेन टय़ूमर झाल्यानंतरही जीवन असाध्य नक्कीच नाही!
‘अमुक एक गोष्ट केली तर ब्रेन टय़ूमर होईल’, आणि ‘अमुक एक केले तर तो टाळता येईल’, अशी सोपी विभागणी करणे अशक्य आहे. ‘ब्रेन टय़ूमर झाला की सगळे संपले!’ अशी अनेकांची भूमिका असते. ‘टय़ूमर म्हणजे कॅन्सरच’ अशा भ्रमातही अनेकजण असतात. या चुकीच्या समजामुळे ब्रेन टय़ूमर हा ‘भीतीचा गोळा’ठरतो! ब्रेन टय़ूमर म्हणजे नेमके काय, तो कसा होतो, त्यावरील अत्याधुनिक उपचारपद्धती कोणत्या, याबद्दल माहिती घेऊया या डॉ. संदीप इंचनाळकर(न्यूरोसर्जन) यांच्या लेखामधून..
बंद कवटीत जेव्हा ब्रेन टय़ूमरची गाठ जागा व्यापू लागते तेव्हा तिचा दाब मेंदूवर पडायला लागतो. त्यामुळे ब्रेन टय़ूमरच्या ७५ ते ८० टक्के रुग्णांमध्ये टय़ूमर झाल्याची लक्षणे दिसून येतात. डोकेदुखी, उलटी होणे अशा लक्षणांबरोबरच मेंदूच्या ज्या भागावर दाब पडतो आहे त्या भागाशी संबंधित असलेल्या शारीरिक कार्यात बिघाड होणे अशी लक्षणे दिसू शकतात. या प्रकारात दृष्टी अधू होणे, दृष्टीस पडलेल्या गोष्टी लक्षात न राहणे, रंग ओळखता न येणे, बोलताना अडखळणे, हाता-पायातली ताकद कमी होणे अशा तक्रारीही आढळतात, पण वीस टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. काही रुग्णांत ब्रेन टय़ूमर खूप सावकाश वाढतो. त्यामुळे मेंदूतली जागा व्यापली जाण्याची प्रक्रियाही सावकाश होते. अशा रुग्णांमध्ये मेंदूला या गाठीची सवय होत जाते आणि त्यामुळे कोणतीही लक्षणेही दिसत नाहीत.
‘टय़ूमर झाला म्हणजे तो कॅन्सरच असणार’, असा सार्वत्रिक समज आपल्याकडे आढळून येतो, हे मात्र खरे नाही. टय़ूमरची गाठ कॅन्सरची नसलेलीही असू शकते हे लक्षात घेणे आवश्यक आहे. मेंदूतील टय़ूमरची गाठ कॅन्सरची असण्याची शक्यता साधारणपणे ५० ते ६० टक्के असते. म्हणजेच उरलेल्या ५० टक्के रुग्णांचा टय़ूमर हा कॅन्सर नसतो. मेंदूतील कॅन्सरच्या नसलेल्या गाठी शस्त्रक्रियेद्वारे पूर्णपणे बाहेर काढता येतात. शस्त्रक्रियेनंतर रुग्ण अल्पावधीत बरा होऊन अगदी पूर्वीसारखे आयुष्यही जगू लागतो
गेल्या तीस वर्षांत ब्रेन टय़ूमरच्या शस्त्रक्रियांमध्ये प्रचंड प्रमाणात बदल झाले आहेत. पूर्वी जे टय़ूमर असाध्य मानले जात ते आज साध्य आहेत. ज्या शस्त्रक्रिया करायला पूर्वी दहा-दहा तास लागत त्या शस्त्रक्रिया आता दोन तासांतही होऊ शकतात. एमआरआय प्रतिमांसारख्या तंत्रांद्वारे टय़ूमरची गाठ खूप लहान असतानाच लक्षात येते. शस्त्रक्रिया झाल्यानंतर दहा मिनिटांत रुग्ण शुद्धीवर येतो, बोलायलाही लागतो! लहान शस्त्रक्रियेनंतर तर रुग्णाला दुसऱ्या दिवशी रुग्णालयातून घरी सोडणेही शक्य होते. हा आमूलाग्र बदल गेल्या दहा वर्षांत झाला आहे.
परदेशात ब्रेन टय़ूमरच्या ज्या अत्याधुनिक शस्त्रक्रिया केल्या जातात ,त्या आज पुण्या-मुंबई प्रमाणे कोल्हापूर (लाइफ लाइन हॉस्पिटल) मध्येही यशस्वीपणे केल्या जाऊ शकतात, यासाठी अद्ययावत दुर्बिणींचा शस्त्रक्रियेसाठी वापर, ‘क्यूसा’ म्हणजे ‘(कॅव्हिट्रॉन अल्ट्रासाऊंड अॅस्पिरेटर’) चा वापर यामुळे शस्त्रक्रिया अधिक सुकर बनल्या आहेत. टय़ूमरचे लहान तुकडे करून काढण्याऐवजी क्यूसा या यंत्रणेद्वारे टय़ूमरला ‘व्हेपराईज’ करून म्हणजे वाफ स्वरूपात आणून शोषून घेता येते. आता ‘स्टिरिओटॅक्टिक सर्जरी’ त मेंदूतील कोणत्याही भागापर्यंत अचूकतेने पोहोचून टय़ूमरची ‘बायोप्सी’ करता येते. यात सर्वच रुग्णांना पूर्ण भूल देण्याचीही गरज नसते. ‘लोकल अॅनास्थिशिया’ देऊनही बायोप्सी करता येते. रुग्ण एकीकडे बोलत असताना त्याच्या मेंदूत सरळ ‘प्रोब’ घालून टय़ूमरची बायोप्सी काढणे म्हणजे पुढील निदानासाठी टय़ूमरचा तुकडा किंवा पस काढणे शक्य होते. या तुकडय़ाचा दुर्बिणीखाली अभ्यास केला जातो. त्यात कोणत्या प्रकारच्या पेशी आहेत यावर ती गाठ साधी आहे की कॅन्सरची आहे, याचे निदान होते. त्यावर पुढील उपचारांची दिशा ठरते.
मानवी जनुकांमध्ये होणारे बदल टय़ूमरसाठी मूलत: कारणीभूत ठरतात. प्रत्येक पेशीत आपल्यासारखीच पेशी निर्माण करण्याचा गुणधर्म असतो. ही नवी पेशी जुन्या पेशीसारखीच असते. त्यामुळेच शरीरातील काही पेशी खराब झाल्या तरी त्यांची कमतरता नव्या पेशी भरून काढतात. जनुकावर विपरीत परिणाम झाला तर नव्याने तयार होणारी पेशी वेगळ्या प्रकारची असू शकते. अशा वेगळ्या पेशींपासूनच पुढे गाठ निर्माण होण्याची शक्यता असते. भोवतालच्या नैसर्गिक बदलांचे दूरगामी परिणामही जनुकीय बदलांमध्ये दिसू शकतात. मोबाईल फोनचा अतिवापर ब्रेन टय़ूमरला कारणीभूत ठरतो असे म्हटले जाते. हे पुराव्यानिशी जरी सिद्ध करता येत नसले तरी प्रबळ इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरी मानवातील जनुकीय बदलांसाठी कारणीभूत ठरू शकतात.
‘अमुक एक गोष्ट केली तर ब्रेन टय़ूमर होईल’, आणि ‘अमुक एक केले तर तो टाळता येईल’, अशी सोपी विभागणी करणे अशक्य आहे. पण ब्रेन टय़ूमर झाल्यानंतरही जीवन असाध्य नक्कीच नाही! त्यातून वाट काढायचे मार्ग आहेत. ते अगदी अत्याधुनिक आणि यशस्वितेच्या कसोटीवर उतरलेले आहेत.उपचारांनंतर रुग्ण त्याचे उरलेले आयुष्य अगदी पुर्वीसारखेच जगू शकतो. त्यामुळे ब्रेन टय़ूमर रुग्णाच्या आयुष्यात एखाद्या परीक्षेसारखा असेल कदाचित् पण तो भीतीचा गोळा ठरायला नको!
Acquaintanceship program At Sawantwadi
Acquaintanceship program At Sawantwadi
Yes our social responsibility of educating common people about stroke (paralysis) and spine diseases, we did another public lecture and CME at SAWANTWADI.
We r overwhelmed by the response of public at SAWANTWADI ..
Public Lecture And Cme At Malvan
Yes Our Social Responsibility Of Educating Common People About Stroke (Paralysis) And Spine Diseases, We Did Another Public Lecture And Cme At Malvan. We R Overwhelmed By The Response Of Public At Malvan.
Successfully Done Brain Aneurysm Treatment
Another Successfully Done Brain Aneurysm Treatment at lifeline trauma brain and spine center , Kolhapur by dr Inchanalkar
Brain aneurysm is one of the commonest cause of brain haemorrhage (sub arachnoid), wherein patient presents with severe headache and neck pain. These patients should reach a neurosurgeon at the earliest, so that they can be investigated and the brain aneurysm can be treated properly.
We at lifeline hospital offer nonoperative (coiling) and operative (clipping) both modalities, and have successfully done several such aneurysm treatment by non surgical, latest, interventonal treatment.
Last week we did similar case of ACA aneurysm treated by coiling in a 70 yr old lady and she recovered immediately, so the morbidity of surgery and stay also reduced. But the selection of cases is important for this treatment. We have done around 50-70 cases in last 10 yrs.
World head injury awareness day 2019
अपघाती इजा रुग्णांच्या दृष्टीने अपघातानंतर पहिला तास रुग्णांच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो . या कालावधीत योग्य मदत मिळाल्यास रुग्णाचा जीव वाचण्याची शक्यता जास्त वाढते . अपघातामध्ये मेंदूची गंभीर इजा ,हृदय फुफ्फुसे व रक्तवाहिन्यांना झाल्यास तातडीने मृत्यू होतो. कोणत्याही अपघातामध्ये सर्वात महत्वाची इजा म्हणजे मेंदूचा मार कारण मेंदू सर्व अवयवांवर नियंत्रण ठेवत असतो . अशा परिस्थीतीत ग्लासगो कोमा मार्गदर्शक ठरते . डोळे उघडणे , शरीराची हालचाल , बोलणे ह्या बाबी तपासून गूण ठरतात . या गुणांची बेरीज १५ असली तर रुग्ण पूर्ण शुद्धीत आहे , संख्या ८ गुण संख्या पेक्षा कमी असल्यास रुग्ण गंभीर किंवा अतिगंभीर आहे . असे गृहीत धरून रुग्णास ताबडतोब अतिदक्षता विभागात उपचार करणे गरजेचे ठरते. मेंदूच्या प्राथमिक इजा मध्ये मधली इजा ( Mild injury ) तर मेंदूच्या मध्यम प्रकारची इजा ( moderate Injury जास्त लागलेने मेंदूला सूज येणे . ( severe cerebral oedema ) किंवा मेंदूची गंभीर इजा यामध्ये मेंदूला सूज जास्त असलेने मेंदूवरील दबाव वाढतो . मेंदूचा काही\भाग कवठीतून खाली सरकणे (Herniation) डोळ्यांची बाहुली मोठे होणे . तसेच एका बाजूची ताकद जाणे इत्यादी गंभीर लक्षणे दिसतात शेवटची म्हणजे घातक इजा - फुफुसं हृदयाची केंद्रे मेंदूचा गाभा या भागास इजा झाल्यास रुग्णांवर मृत्यूचा धोका ओढवू शकतो . अशा स्तिथीत तातडीने मेंदू तज्ञाची मदत घेणे अत्यावश्यक ठरते, तसे न झाल्यास रुग्ण गंभीर होऊन दगावू शकतो. अशा वेळेस पहिल्या तासामध्ये ( म्हणजे गोल्डन अवर) मध्ये रुग्णाला अपघात सेंटर मध्ये परिपूर्ण उपचार मिळाल्यास जीव वाचवण्याची शक्यता वाढते.
प्रथमोपचाराचे प्रकार - ( Basic Life Support ) ( CPR) जीवनसंजीवनी उपचार ह्यामध्ये - -
- A - Airway - श्वसनमार्ग खुला करणे .
- B - Breething - श्वसनगती नीट करणे .
- C - Circulation - रक्ताभिसरण योग्य करणे
- E - EXPOSURE - सर्व शरीर उघडे करून छाती
पोट, पाठ इ . तपासणे हि सर्व क्रिया व्यस्थित केली तर रुग्ण गंभीर होण्यासाठी किंवा मेंदूतज्ज्ञ पर्यंत पोहोचण्याआधी त्याचे प्राण वाचतील अपघाताने झालेले मेंदूमधील रक्तस्त्राव मेंदूच्या कवटीचे फ्रॅक्चर यावर योग्य प्रकारचे उपचार / आधुनिक शल्यचिकीत्सा लाईफ लाईन हॉस्पिटल मध्ये नेहमीच यश्वसरित्या पार पाडल्या जातात.
डॉ . संदीप इंचनाळकर न्यूरो स्पाइनल सर्जन
Lecture and CME at Vengurla.
Continuation of our social responsibility of educating common people about stroke (paralysis) and spine diseases, we did another public lecture and CME at Vengurla. We r overwhelmed by the response of public at Vengurla.
Birthday Celebration of Young patient with stroke
Another happy event on valentine day, one of our young patient with stroke. Celebrated his birthday with the staff of lifeline hospital Fantastic day today.
Informative lecture for the Rural people at Murgud
If we need to change the outcome in stroke patients,we need to educate them.The time for best stroke(paralysis) treatment is short, so the patient need to reach a neurosurgeon as early as possible.
In order to change the present scenario in stroke, wherein people go to wrong places for stroke treatment esp people from rural areas.We at lifeline hospital with dr Sandeep Inchanalkar and his team started taking this informative lectures for the people of rural areas. We conducted a similar lecture of public awareness on brain and spine diseases at Murgud, and an overwhelming response shown in the pictures.
Cricket Tournament - SRT Premier league 2018
Apart from our routine academic activity, our hospital participated in cricket tournament in this month.
Our team Life Line warriors along with Dr.Sandeep inchanalkar performed very well in the tournament and won the runners-up trophy of SRT premier league 2018. Here are some of the pictures of the same.
Dr.Inchanalkar giving lecture on Neurological Illness to Radhanagari Villegers
Education is very important in all fields. It helps us to understand the subject well. The education of people in villages is increasing day by day, considering this , we at life line hospital with dr Sandeep Inchanalkar decided to educate people about neurological illness.Also the brain cells and spinal cord cells don’t regenerate so every effort must be made to save them, the saving of cells is like prevention of disease.
We decided to do the change, and started doing such informative and educational activities to people about stroke, headinjuries, brain tumours, epilepsy and spine diseases, and to our surprise we received a overwhelming response at Radhanagari.