एक सुसज्ज व नीटनेटके स्वच्छ व नावारूपाला आलेले हॉस्पिटल.
माझा चार दिवसाचा अनुभव
हॉस्पिटल मध्ये पेशंटने प्रवेश केल्यानंतर हॉस्पिटलचे कर्मचारी प्रेमाने व आपल्या घरचा मेंबर असल्या प्रमाणे पेशंटला भरती करून घेण्यासाठी लागणारी सर्व प्रक्रिया सुलभतेने पार पाडून पेशंटला आपले पण देऊन त्याची व्यवस्था करणे.
हॉस्पिटल मध्ये प्रत्येकाची कामे कोणतीही तक्रार न करता व एकमेकावर कामाची जबाबदारी न टाकता हॉस्पिटल आपलेच आहे समजून हॉस्पिटल स्वच्छ व नीटनेटके कसे राहील याची जाणीव ठेवून व पेशंटशी हसतमुखाने व धीर देऊन काम करणारा कर्मचारी वर्ग.
त्याच प्रमाणे वेळच्या वेळी पेशंटला तपासणी करून त्यांच्या सर्व शंकांचे प्रेमाने उत्तर देऊन धीर देऊन वेळच्या वेळी हसत मुखाने व आपुलकीने औषधे देणाऱ्या नर्स.
त्याच प्रमाणे डॉक्टरही फार उत्कृष्ट व वेळेत रेग्युलर तपासणी करून पेशंटला योग्य मार्गदर्शन करणारे सर्व डॉक्टर स्टाफ
त्याचप्रमाणे डॉ इंचानकर सरांन बद्दल बोलायचे तर उच्च विद्याविभूषित असूनही एकदम संयमी व साधे राहणीमान पेशेंटशी आपलेपणाने व प्रेमाने वागणारे अचूक निदान करणारे, कोणाचे कितीही जवळचे संबंध असले तरी कामाच्या वेळी सर्वांना एकच वागणूक देणारा स्वभाव व सर्व कर्मचारी घरचे असल्यासारखी दिलेली वागणूक त्या मुळे सर्व कर्मचाऱ्याच्या मनात आपलेच हॉस्पिटल असल्यासारखे वाटून आनंदाने केलेले काम सर्वांना भराऊन टाकते कोठेही गडबड, गोंधळ नाही आशा प्रकारे हॉस्पिटलच्या प्रशासनाने केलेली व्यवस्था व त्यावर असणारे बारीक लक्ष हे ही वाखाणण्या सारखे आहे.
मेडिकल स्टोअर मध्ये सुधा लागणारीच औषधे देऊन व न वापरलेली औषधे परत घेउन पेशंटला दिलेला आर्थिक आधार फार समजून घेण्यासारखा आहे.
त्याच प्रमाणे हॉस्पिटल मधील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असो किंवा पेशंटला व नातेवाईकांना लागणाऱ्या आंघोळी साठी लागणाऱ्या मुबलक पाण्याची व्यवस्था व त्याचे योग्य नियोजन उत्कृष्ट आहे.
एकंदरीत डॉ इंचानलकर साहेब एका लहानशा गावातून, मुंबई सारख्या आंतरराष्ट्रीय शहरांत राहून व आपले शिक्षण पूर्ण केले , त्यांनी मुंबईत हॉस्पिटल काडून चांगला पैसा कमावला असता पण त्यांनी विचार केला असावा आपण ग्रामीण भागातू आलो आहे, जन सेवा हीच ईश्वर सेवा समजून
ही सेवा आपण योग्य दरात आपल्या गरीब लोकांना आपल्या भागात दिली तर याच्या सारखे पुण्य नाही म्हणून त्यांनी कोल्हापूर सारख्या ठिकाणी हॉस्पिटल कडून आपल्या गरीब लोकांची सेवा करणेसाठी केलेला यशस्वी प्रयत्न स्मरणात ठेवण्यासारखा आहे.
त्यांनी आपल्या अनुभवाचा असाच उपयोग करून आपल्या ग्रामीण भागातील गरीब व गरजू लोकांची सेवा करावी अशी आशा बाळगतो व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो.
आपलाच
श्री विलासराव बुगडे
मुंबई